Political Drama || मतदारांना वाटले 'होम मिनिस्टर'चे फ्री गिफ्ट; दुकानदाराला मात्र लोकप्रतिनिधींचे 'वादे पे वादे'!

May 18, 2026 - 19:36
May 18, 2026 - 19:37
 0
Political Drama || मतदारांना वाटले 'होम मिनिस्टर'चे फ्री गिफ्ट; दुकानदाराला मात्र लोकप्रतिनिधींचे 'वादे पे वादे'!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​खेड (पुणे): सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सध्या भलत्याच 'प्रतापा'मुळे चर्चेत आले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी मतदारांना, विशेषतः महिला भगिनींना आकर्षित करण्यासाठी या महाभागाने 'होम मिनिस्टर'सारखे भव्य कार्यक्रम राबवले खरे, पण गाजावाजा करून वाटलेली ती बक्षीसं स्वतःच्या खिशातील पैशातून नाही, तर एका गरिबाच्या उधारीवर बेतलेली होती, असा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. निवडणूक जिंकून 'बाबा' गादीवर तर बसले, पण ज्या दुकानदाराकडून बक्षीसांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतल्या, त्याचे हक्काचे पैसे देण्यास मात्र आता हे लोकप्रतिनिधी टाळाटाळ करत आहेत.

निवडणुकीत 'अतिश्रीमंत' होणारे नेते बिलाच्या वेळी 'अतिगरीब'?

​हा सगळा प्रकार चाकण परिसरातील एका नामांकित इलेक्ट्रॉनिक दुकानदारासोबत घडला आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांना खुश करण्यासाठी या सदस्याने मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तू बक्षीस म्हणून नेल्या. दुकानदार बिचारा हक्काच्या पैशांसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून या सदस्याचे उंबरठे झिजवतो आहे. मात्र, "निवडणुकीत अतोनात खर्च झाल्यामुळे सध्या माझे बजेट कोलमडले आहे, अत्यंत गरिबी आली आहे," असे अजब आणि हास्यास्पद कारण पुढे करत हे सदस्य महोदय "या महिन्यात देतो, पुढच्या महिन्यात देतो" असे 'वादे पे वादे' करत दुकानदाराला फिरवत आहेत. लोकप्रतिनिधीच्या या वर्तणुकीमुळे हतबल झालेल्या दुकानदाराला आता मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सत्ताधारी पक्षाची प्रतिष्ठा पणाला; आत्मपरीक्षणाची गरज!

विशेष म्हणजे, हे सदस्य तालुक्यात आणि पंचायत समितीत चांगल्या वजनदार सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या अशा थकीत आणि पळपुढ्या वागण्यामुळे आपल्या पक्षाची, नेत्यांची आणि स्वतःची काय इभ्रत बाजारात जात आहे, याचे भानही त्यांना राहिलेले दिसत नाही. "निवडणुकीची एवढीच आग होती आणि व्यापाऱ्यांचे पैसेच द्यायचे नव्हते, तर मग समाजात लोकप्रतिनिधी म्हणून फिरताना यांना जनाची नाही तर मनाची कशी वाटत नाही? यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. यांना 'सन्माननीय सदस्य' म्हणायचे की 'पैसे बुडवे'?" असा संतप्त सवाल आता पीडित दुकानदाराने उपस्थित केला आहे.

...तर दोन दिवसांत 'फोटो'सह पोलखोल!

सदर दुकानदाराकडे या सदस्याने घेतलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अधिकृत बिले आणि पुरावे उपलब्ध आहेत. लोकप्रतिनिधी आहोत म्हणून कायद्याचा आणि पदाचा धाक दाखवून जर कोणी व्यापाऱ्याला नडत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा पवित्रा दुकानदाराने घेतला आहे. जर येत्या दोन दिवसांत या सदस्याने दुकानदाराची हक्काची उधारी चुकती केली नाही, तर या 'पैसे बुडव्या' पंचायत समिती सदस्याचे नाव, पक्ष आणि त्यांचा फोटो थेट सोशल मीडियावर व्हायरल करून संपूर्ण तालुक्यात त्यांची 'धिंड' काढली जाईल, असा थेट इशारा दुकानदाराने दिला आहे.

त्यामुळे आता हे महाभाग आपली उधारी देऊन अब्रू वाचवतात की तालुक्यात स्वतःचे हसे करून घेतात, याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 1
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 1
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी