राजकीय : श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या विकासकामांची महत्त्वपूर्ण बैठक; भीमाशंकर देवस्थानच्या हद्दीबाबत खेड तालुक्याची विनंती..
लोकन्याय मराठी विशेष प्रतिनिधी
मुंबई : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आज आदरणीय श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या समवेत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीत प्रामुख्याने कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक भूखंड उपलब्ध करून देणे, तसेच जिल्ह्यातील गायरान जमिनीच्या वापराबाबत योग्य ते नियोजन करण्यावर भर देण्यात आला. यासोबतच म्हाळुंगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (PHC) बळकटीकरणासाठी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
भीमाशंकर देवस्थानबाबत खेड तालुक्याची आग्रही विनंती..!
बैठकी दरम्यान एक महत्त्वाचा स्थानिक मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रसिद्ध व पवित्र ज्योतिर्लिंग देवस्थान 'श्री क्षेत्र भीमाशंकर' हे भौगोलिकदृष्ट्या खेड तालुक्याच्या हद्दीत येते. त्यामुळे या पवित्र देवस्थानच्या ठिकाणी खेड तालुक्याचे नाव कायम राखले जावे, अशी आग्रही विनंती यावेळी श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्याकडे करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती..
या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, गणेश बोत्रे, जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक विकासकामांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0