Rape Case || चाकण परिसरात तरुणीवर अत्याचार; लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण: लग्नाचे आमिष दाखवून एका २० वर्षीय तरुणाने अल्पवयीन तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चाकण परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीच्या ओळखीचा फायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. या प्रकारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने याप्रकरणी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे. गर्भवती पीडित मुलीने एका गोंडस स्त्री लिंगी अर्भकाला जन्म दिल्याचीही माहिती समोर आली आहे. बाळ व आई सुखरूप असल्याचीही माहिती मिळाली आहे.
पोलिस कारवाई:
या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध BNS कलम ६४(२)(m), ६५(१), ३५१(२) आणि पोक्सो कलम ४, ८, १०, १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास तपासी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम या करत आहेत.
तपासाची सद्यस्थिती:
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाला आवश्यक त्या सूचना दिल्या असून, तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया उत्तर चाकण पोलीस पार पाडत आहेत.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
1
Angry
0
Sad
1
Wow
1