मोठी बातमी : खेड तालुक्यातील तुकाईवाडी येथे कंटेनरला गळफास घेऊन अनोळखी तरुणाची आत्महत्या...!

Mar 22, 2026 - 20:15
 0
मोठी बातमी : खेड तालुक्यातील तुकाईवाडी येथे कंटेनरला गळफास घेऊन अनोळखी तरुणाची आत्महत्या...!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

राजगुरुनगर (पुणे): खेड तालुक्यातील तुकाईवाडी गावच्या हद्दीत एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाने कंटेनरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, २२ मार्च २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, मृताची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

घटनेचा तपशील...

​मिळालेल्या माहितीनुसार, तुकाईवाडी गावाच्या हद्दीत नवीन बायपास जवळ HR 55 AK 3283 क्रमांकाचा कंटेनर उभा होता. रविवारी सकाळी ९ ते १० च्या सुमारास या कंटेनरच्या डाव्या बाजूला एका व्यक्तीने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले.

​स्थानिक नागरिक करण सांडभोर यांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलीस पाटील सचिन वाळुंज यांना दिली. वाळुंज यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, कंटेनरच्या बॉडीला एक तरुण लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृत व्यक्तीचे वर्णन..

• ​वय: अंदाजे ३० ते ३५ वर्षे.

• ​पोशाख: अंगात निळ्या आणि गुलाबी पट्ट्यांचा फुल बाह्यांचा शर्ट, निळी पँट आणि पायात तांबड्या (लाल) रंगाची चप्पल.

• ​ओळख: अद्याप पटलेली नाही.

पोलीस कारवाई...

​घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला 'दाखल करण्यापूर्वीच मृत' घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, मृत्यूचे कारण गळफास असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तपास सुरू..

​खेड पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित कंटेनर हरियाणा राज्यातील असून, पोलीस वाहन मालक आणि चालकाचा शोध घेत आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी करून मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी