Khed Bhondu Baba || धर्माच्या नावाखाली वासनेचा बाजार! खेडमधील 'त्या' भोंदू महाराजाचा बुरखा फाटला; महिलांचे शोषण करणारा नवनाथ गवळी अद्याप मोकाटच!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड (पुणे): पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. अध्यात्माचा बुरखा पांघळून महिलांच्या हतबलतेचा फायदा घेणाऱ्या एका 'वासनांध' भोंदू बाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आला आहे. चांडोली येथील शिवदत्त आश्रमाचा सर्वेसर्वा नवनाथ गवळी याने अंधश्रद्धेचे जाळे विणून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप एका पीडितेने केला आहे.
श्रद्धेचा गैरफायदा आणि 'दोष निवारणा'चे थोतांड
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीणमधील ही घटना मे २०२५ पासून सुरू होती. पीडित ३४ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह श्रद्धेपोटी शिवदत्त आश्रमात दर्शनासाठी जात होती. मात्र, १७ जुलै २०२५ रोजी पहाटे जपाच्या वेळी या भोंदू नवनाथ गवळीने महिलेचा विनयभंग केला. "तुझ्या अंगातील दोष दूर करण्यासाठी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील," अशी निर्लज्ज मागणी या नराधमाने केली. सुरुवातीला सामाजिक भीतीपोटी महिलेने केवळ विनयभंगाची तक्रार दिली होती, मात्र आता आपल्यावर अत्याचार झाल्याची धक्कादायक कबुली पीडितेने दिली आहे.

भोंदूगिरीची कार्यपद्धती: 'अंगात येण्याचे' नाटक..
तपासात या भोंदू बाबाच्या अघोरी कृत्यांची माहिती समोर येत आहे:
• महिलांच्या 'अंगात' येण्याचे खोटे प्रकार घडवून आणणे.
• महिलांमध्ये काहीतरी दैवी शक्ती असल्याचे भासवून त्यांच्या मनावर ताबा मिळवणे.
• 'दोष' काढण्याच्या नावाखाली महिलांना एकांतात बोलावून त्यांचे शारीरिक शोषण करणे.
"आम्ही देवाच्या श्रद्धेने तिथे गेलो होतो, पण या माणसाने अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे. अंगात येण्याचे थोतांड रचून तो महिलांचे शोषण करतो. आमच्या कुटुंबाला आता त्याची भीती वाटतेय."
— पीडित महिलेची आर्त हाक
पोलीस प्रशासन सुस्त, भोंदू बाबा मस्त!
सर्वात संतापजनक बाब म्हणजे, गुन्हा दाखल होऊनही आरोपी नवनाथ गवळी अद्याप मोकाट फिरत आहे. हे प्रकरण न्यायालयात असतानाही आरोपी एकाही तारखेला हजर राहत नसल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या दहशतीमुळे पीडितेचे कुटुंब सध्या प्रचंड दडपणाखाली वावरत आहे. खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी अटकेची कारवाई का लांबणीवर पडत आहे? हा मोठा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
आता गप्प बसू नका; पुढे या!
अंधश्रद्धा निर्मूलनाचे गोडवे गायले जात असताना, पुण्याच्या ग्रामीण भागात धर्माच्या नावाखाली महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. 'खरात' प्रकरणातून प्रेरणा घेऊन या पीडितेने आवाज उठवला आहे. अशाच प्रकारे या भोंदूच्या जाळ्यात अडकलेल्या इतरही महिलांनी न डगमगता समोर येण्याची गरज आहे, जेणेकरून या नराधमाला कायमची कोठडीची हवा दाखवता येईल.
अशा भोंदू बाबांपासून सावध राहा. धर्माच्या नावाखाली कुणीही शारीरिक सुखाची मागणी करत असेल, तर तो 'देवमाणूस' नसून 'राक्षस' आहे, हे ओळखा आणि पोलिसांशी संपर्क साधा.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
2
Sad
1
Wow
0