Scame In Trust || कळस बुद्रुक ग्रामसभेत 'कळसेश्वर देवस्थान'च्या बेईमान कारभाराचा पंचनामा; ग्रामस्थांचा संताप, विश्वस्तांचे तोंड लपवून 'पळकुटे' धोरण! 

Apr 13, 2026 - 19:47
 0
Scame In Trust || कळस बुद्रुक ग्रामसभेत 'कळसेश्वर देवस्थान'च्या बेईमान कारभाराचा पंचनामा; ग्रामस्थांचा संताप, विश्वस्तांचे तोंड लपवून 'पळकुटे' धोरण! 

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​कळस बुद्रुक (अहिल्यानगर)अकोले तालुक्यातील धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या परमपूज्य सुभाषपुरी महाराज कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचा अनागोंदी आणि नियमबाह्य कारभार आज ग्रामसभेच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. "देवस्थान आमचे आणि कारभार तुमचा?" असा संतप्त सवाल विचारत ग्रामस्थांनी सध्याच्या विश्वस्त मंडळाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. विशेष म्हणजे, आजच्या सभेत चौकशीचा फेरा मागे लागेल या भीतीने बहुतांश विश्वस्तांनी सभेकडे पाठ फिरवली, ज्याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत रंगली आहे.

ग्रामसभेत दोन विश्वस्तांची 'मूक सहमती'?

​आज पार पडलेल्या ग्रामसभेत देवस्थानच्या भ्रष्ट कारभारावर आणि मनमानी कारभारावर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला. या सभेला २१ पैकी केवळ दोन विश्वस्त उपस्थित राहिले. उर्वरित विश्वस्तांनी दांडी मारल्याने "या ट्रस्टींना हटवण्यासाठी उपस्थित दोन विश्वस्तांची मूक सहमती आहे की काय?" असा खोचक प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आजच्या ग्रामसभेत ट्रस्टच्या बेईमान कारभारावर चर्चा होणार हे निश्चित असल्यानेच इतर विश्वस्तांनी तोंड लपवून ग्रामसभेत येण्याचे टाळले, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

नक्की कारभारी कोण? गावकऱ्यांचा सवाल..

​ट्रस्टच्या अधिकृत कागदपत्रांनुसार (योजना अर्ज २६/२०२१) विठ्ठल भिकाजी वाकचौरे (अध्यक्ष), विष्णू भाऊसाहेब वाकचौरे (उपाध्यक्ष), गोपीनाथ बाळासाहेब ढगे (सचिव) आणि मिराबाई बाळासाहेब खताळ (खजिनदार) यांच्यासह एकूण २१ जणांचे जडजंबाल मंडळ सत्तेवर आहे. मात्र, गावातील सामान्य नागरिकांना "नक्की कारभार कोण करतंय?" हेच समजेनासे झाले आहे. ट्रस्टच्या नावाखाली केवळ काही ठराविक लोकच मनमानी करत असल्याचा संशय बळावला आहे.

घटनेची मोडतोड: "ट्रस्ट तुमची खासगी मालमत्ता आहे का?"

​गावकऱ्यांनी आरोप केला आहे की, या विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्तांच्या नियमांना केराची टोपली दाखवत घटनेत सोयीनुसार बदल केले आहेत. जणू काही हे देवस्थान गावाची सार्वजनिक मालमत्ता नसून विश्वस्तांची खासगी जहागीर आहे, अशा आविर्भावात त्यांचा कारभार सुरू आहे. धर्मादाय कायद्यातील कलम ५० अ नुसार होणारी कामे पारदर्शक होण्याऐवजी ती पडद्याआड होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

झारीतील शुक्राचार्य ओळखा; गावकऱ्यांनो जागे व्हा!

​"तुमची मोठी फसवणूक झाली आहे," अशी हाक देत गावातील सुजाण नागरिकांनी आता या भ्रष्ट कारभारामागील 'झारीतील शुक्राचार्य' शोधण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. देणग्यांचा हिशोब, मालमत्तांचे भाडे आणि ८०% सामाजिक कामावर खर्च होणारा निधी नक्की कुठे जातो? असा रोखठोक प्रश्न विचारला जात आहे. 

मुख्य मागण्या आणि ठराव:

१. सध्याच्या 'बेईमान' विश्वस्त मंडळाने नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.

२. धर्मादाय आयुक्तांमार्फत या ट्रस्टच्या मागील पाच वर्षांच्या हिशोबाची आणि कामाची सखोल चौकशी व्हावी.

३. गावातील निष्कलंक आणि सेवाभावी व्यक्तींची नवीन निवड करण्यात यावी.

ग्रामसभेतील हा रणसंग्राम पाहता, आता कळसेश्वर देवस्थानचा हा वाद धर्मादाय आयुक्तांच्या दरबारात पोहोचणार हे निश्चित आहे. विश्वस्तांनी जर नियमानुसार कारभार केला असेल, तर ते ग्रामसभेला का घाबरले? असा सवाल आता कळस बुद्रुकचा प्रत्येक नागरिक विचारत आहे.

ट्रस्टवरील मुख्य पदाधिकारी आणि विश्वस्त:

• ​अध्यक्ष: विठ्ठल भिकाजी वाकचौरे

• ​उपाध्यक्ष: विष्णू भाऊसाहेब वाकचौरे

• ​सचिव: गोपीनाथ बाळासाहेब ढगे

• ​खजिनदार: मिराबाई बाळासाहेब खताळ

• ​विश्वस्त: कारभारी वाकचौरे(मयत आहेत नाव कायम), बाळासाहेब वाकचौरे, संभाजी वाकचौरे, भरत वाकचौरे, प्रदीप वाकचौरे, देवराम वाकचौरे, किसन भुसारी, शिवनाथ शिर्के, सहादु चौधरी, प्रकाश आल्हाट, बाळू बिबवे, सुनील ढगे, विवेक वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे, सीताराम वाकचौरे, रमेश जोर्वेकर, रामनाथ वाघमारे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 1
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी