Theft of Gold Jewelry || ओळखीच्या 'मैत्रिणीचा' डाव, बनावट चावीने १० तोळ्यांवर मारला ताव; दक्षिण महाळुंगे पोलिसांनी २४ तासांत आवळल्या मुसक्या.!

Apr 26, 2026 - 22:52
 0
Theft of Gold Jewelry || ओळखीच्या 'मैत्रिणीचा' डाव, बनावट चावीने १० तोळ्यांवर मारला ताव; दक्षिण महाळुंगे पोलिसांनी २४ तासांत आवळल्या मुसक्या.!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण (पुणे) : ज्या हातांनी मैत्रीचे नाते जपायचे, त्याच हातांनी विश्वासाला तडा देत घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार महाळुंगे येथे उघडकीस आला आहे. एका ओळखीच्या महिलेने बनावट चावीचा वापर करून घरातून तब्बल १३ लाख ८७ हजार रुपये किमतीचे १० तोळे सोने लांबवले होते. मात्र, दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपल्या तपासाचे चक्र वेगाने फिरवत अवघ्या २४ तासांत या घरफोडीचा छडा लावून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी दिवसा घरफोडीचा हा प्रकार घडला होता. फिर्यादी यांच्या घरातून कपाटातील दागिने चोरीला गेल्याने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (१) आणि ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाने दिला सुगावा..

​गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पोलिसांना एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौक परिसरात राहणाऱ्या सारिका संतोष भुजबळ (वय ३८) हिला ताब्यात घेतले. 

ओळखीचा गैरफायदा आणि बनावट चावी..

​महिला पोलिसांनी संशयित आरोपी सारिकाची कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी महिला ही फिर्यादीची परिचीत होती. फिर्यादीच्या घरी सोन्याचे दागिने कुठे ठेवले आहेत, याची तिला पूर्ण कल्पना होती. तिने संधी साधून बनावट चावी तयार केली आणि भरदिवसा घर उघडून दागिन्यांवर डल्ला मारला. 

पोलिसांची 'सुपरफास्ट' कामगिरी...

​पोलिसांनी आरोपी महिलेकडून चोरीला गेलेले १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत १३,८७,०००/-) पूर्णपणे हस्तगत केले आहेत. अवघ्या २४ तासांत गुन्ह्याची उकल करत १०० टक्के मुद्देमाल मिळवल्याबद्दल महाळुंगे पोलिसांचे कौतुक होत आहे. 

यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:

ही कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड, श्री. बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त श्रीमती श्वेता खेडकर, आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  

या ​तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सपोनि भास्कर पुल्ली, पोउपनि भारत करे, महिला पोलीस अश्विनी महाडीक, वैष्णवी बालपांडे आणि इतर अंमलदारांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर सांगळे करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी