क्राईम : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कामगिरी; रिक्षा चोरून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला १२ तासांत ठोकल्या बेड्या...

Mar 25, 2026 - 22:25
Mar 25, 2026 - 22:25
 0
क्राईम : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कामगिरी; रिक्षा चोरून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला १२ तासांत ठोकल्या बेड्या...

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

पिंपरी-चिंचवड: रिक्षा चोरी करून त्याद्वारे नागरिकांना लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कशी केली कारवाई..

भोसरी MIDC परिसरात झालेल्या चोरीचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक करत होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता, त्याने रिक्षा चोरी करून जबरी चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपीचे नाव..

 * आरोपी: हरीश विनोद कदम (वय २० वर्षे)

 * राहाणार: लोअर इंदिरा गांधीनगर, बिबेवाडी, पुणे.

उघडकीस आलेले गुन्हे..

पोलिसांनी केलेल्या तपासात खालील तीन पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघड झाले आहेत:

 * भोसरी MIDC पोलीस स्टेशन: (BNS ३०९(६) प्रमाणे)

 * दिघी पोलीस स्टेशन: (BNS ३०४(२) प्रमाणे)

 * सहकारनगर पोलीस स्टेशन (पुणे शहर): (BNS ३०३(२) प्रमाणे)

जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत १,०७,०५०/- रुपये)

 * रिक्षा: १,००,०००/- रुपये किमतीची रिक्षा (क्र. MH 12 SK 4967)

 * मोबाईल: ५,०००/- रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा फोन.

 * रोख रक्कम: २,०५०/- रुपये.

तपास पथक...

सदर उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक जावळे, पोलीस हवालदार बाबा गर्जे, सोमनाथ बोराडे, श्रीधन इचके, सचिन गोनटे, स्वप्निल महाले, वराडे, सुंदर थोरात, निखिल फापाळे आणि राजू इघारे यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी